आसाम सरकारने राज्यातील अधिकृत नागरिकांची नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीजन यादी जाहीर केली आहे. या पहिल्या यादीत १.९ कोटी लोकांना वैध घोषित करण्यात आलं आहे. मात्र या यादीतून १.३९ कोटी लोकांची नावं गायब असल्यानं आसाममधील नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे.आसाममध्ये मोठ्या प्रमाणावर बांगलादेशी राहत असल्याने त्यांची यादी तयार करणार असल्याचं आश्वासन भाजपनं दिलं होतं.१९५१ च्या जनगणनेनुसार हा मसुदा तयार करण्यात आला आहे. यामुळे बांगलादेशी घुसखोरांना शोधणे शक्य होणार आहे. 'ज्यांचे नाव पहिल्या यादीत नाही, त्यांनी चिंता करण्याची गरज नाही. ही अत्यंत कठीण आणि किचकट प्रक्रिया होती. त्यामुळे पहिल्या यादीत काही लोकांना स्थान मिळू शकले नसेल, पण यामुळे घाबरण्याचे कारण नाही,' असे राज्यातील एनआरसीचे समन्वयक प्रतीक हजेला यांनी सांगितले. एनआरसी मसुद्यातील दुसरी यादी कधी जाहीर होणार ? असा प्रश्न विचारला असता 'हे सर्व काम सुप्रीम कोर्टाच्या देखरेखी खाली सुरु आहे. ही संपूर्ण प्रक्रीया २०१८ मध्ये पूर्ण होणार आहे,' असं ते म्हणाले.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews